विद्यार्थ्यांसाठी आचारसंहिता व शिस्त यासंबंधी नियम
-
हे ज्ञानमंदिर माझे आहे . या परिसरातील शोभेल असेल वर्तन मी करेल.मी माझ्या वर्तनातून येथे संस्कारक्षम व पोषक वातावरण निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न करीन. गुरुजनांचा आदर ठेवीन व माझे कर्तव्य मी पार पाडीन.
-
माझ्या वरिष्ठ महाविद्यालयात शिकताना मला खालील आचारसंहिता व शिस्तीसंबंधीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावयाचे आहे. शिस्तीच्या सर्वसाधारण नियमांत कॉलेज कायदा १९९४ नुसार खालील बाबीचा समावेश आहे. खोटी / बनावट कागदपत्र दाखल करुन प्रवेश घेणेवशासकीय सवलतीचा गैरफायदा घेणेयाबाबी शिक्षेस पात्र ठरतील.
-
वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर प्रत्येकाने आपले ओळखपत्र मिळवून स्वत : जवळ सतत बाळगावे आवश्यक त्या विभागाकडून चौकशी केल्यास ते दाखवावे . प्रत्येक वर्षी ओळखपत्राचे नूतनीकरण करावे , त्याशिवाय ओळखपत्र अधिकृत समजले जाणार नाही.
-
महाविद्यालयातील प्राध्यापक , कार्यालयीन कर्मचारी व सेवक यांच्याविषयी विद्यार्थ्यांनी नेहमी आदर बाळगावा.
-
महाविद्यालयातील प्राध्यापक , कार्यालयीन कर्मचारी व सेवक यांच्याविषयी विद्यार्थ्यांनी नेहमी आदर बाळगावा.
-
प्रत्येक विद्यार्थ्यांची शै.वर्षातील महाविद्यालयातील उपस्थिती १००% असणे आवश्यक आहे.
-
महाविद्यालयाच्या परिसरात , वर्गात ववर्गाबाहेर वावरताना इतर विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरेल असे वागू नये.
-
अध्यापनाचे वर्ग , प्रयोग किंवा महाविद्यालयातील इतर कार्यक्रम सुरु असताना इतर विद्यार्थ्यांनी संबंधित ठिकाणी / परिसरात विनाकारण फिरु नये.
-
महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थ्यांनी आपले भ्रमणध्वनी सायलन्स मोडवर ठेवावे / बंद ठेवावेत.
-
महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थ्यांनी आपले भ्रमणध्वनी सायलन्स मोडवर ठेवावे / बंद ठेवावेत.
-
आपली वाहने मोटार सायकल, सायकल वाहनतळात (पाकींग) उभी करावीत. इतरत्र उभी करु नयेत महाविद्यालयाच्या शिस्तीला, सुव्यवस्थेला बाधा येईल, असे वर्तन महाविद्यालयात अथवा महाविद्यालयाबाहेर विद्यार्थ्याने करु नये.
-
मा.प्राचार्याच्या पूर्वपरवानगीशिवाय महाविद्यालयात अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अन्य कोणतेही कार्यक्रम आयोजित करता येणार नाही. तसेच कोणतेही मंडळ अथवा संघटना स्थापन करता येणार नाही.
-
महाविद्यालयाचा परिसर, वर्ग प्रयोगशाळा, ग्रंथालय, वाचनकक्ष, उद्यान, कार्यालय तसेच सर्व प्रकारच शै.मालमत्ता, भिंती , दरवाजे , भौतिक सुविधा यांच्या स्वच्छतेची व जपणुकीची काळजी घेतली पाहिजे, अश मालमत्तेची हानी, नासधूस व विद्रुप करणाऱ्यास गैरशिस्तीखाली शासन करण्यात येईल.
-
महाविद्यालयात शै . साहित्याशिवाय कोणतेही प्राणघातक अथवा शारिरीक इजा पोहोचवणारी शस्त्रे, अवाज स्फोटक विषारी पदार्थ तसेच अंमली पदार्थ असण्यास, गुटखा, तंबाखू, सिगारेट बाळगण्यास व खाण्यास कडक निर्बंध आहेत. असा प्रयत्न गंभीर स्वरुपाचा गुन्हा समजला जाईल.
-
महाविद्यालयात शै . साहित्याशिवाय कोणतेही प्राणघातक अथवा शारिरीक इजा पोहोचवणारी शस्त्रे, अवाज स्फोटक विषारी पदार्थ तसेच अंमली पदार्थ असण्यास, गुटखा, तंबाखू, सिगारेट बाळगण्यास व खाण्यास कडक निर्बंध आहेत. असा प्रयत्न गंभीर स्वरुपाचा गुन्हा समजला जाईल.
-
एखाद्या विद्यार्थ्याची वर्तवणूक महाविद्यालयाच्या व इतर विद्यार्थ्याच्या हिताला बाधक आहे , असे वाटल्यास त्या विद्यार्थ्यास कोणतेही कारण न दाखवता महाविद्यालयातून काढून टाकण्यात येईल.
-
वरील सर्व नियमांविरुद्ध वर्तन करणाऱ्या विद्यार्थ्यावर विद्यापीठ कायद्यानुसार महाविद्यालयाची अनुशासन सल्लागार समिती कार्यवाही करण्याचा निर्णय घेईल. योग्य त्या कार्यवाहीचे अंतिम अधिकार प्राचार्यांकडे राहतील.
-
वरील सर्व नियमांविरुद्ध वर्तन करणाऱ्या विद्यार्थ्यावर विद्यापीठ कायद्यानुसार महाविद्यालयाची अनुशासन सल्लागार समिती कार्यवाही करण्याचा निर्णय घेईल. योग्य त्या कार्यवाहीचे अंतिम अधिकार प्राचार्यांकडे राहतील.
-
वरील नियमांच उल्लंघन करणाऱ्यास शिस्तभंगाच्या गांभीर्यानुसार दंड आकारणे, वर्गात तसेच महाविद्यालयाच्या परिसरात येणाऱ्यास मज्जाव करणे, शैक्षणिक व इतर सवलती रद्द करणे, सदवर्तनाची हमी मागणे , प्रवेश नाकारणे अथवा महाविद्यालयातून काढून टाकणे इ.शिक्षा करण्याचे अंतिम अधिकार प्राचायांकडे राहतील.
-
जे विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांना रॅगिंगच्या अंतर्गत येणारे वर्तन करुन त्रास देतील , त्यांच्यावर या रॅगिंगविरोधी कायद्यानुसार कार्यवाही कली जाईल . महाविद्यालयात विद्यार्थ्याना मोबाईल , व महाविद्यालयाच्या हिताच्या दृष्टीने वेळोवेळी करावे लागणारे नियम मा.प्राचार्यांच्या आदेशानुसार जाहीर होतील. तसेच त्यावरील निर्णय कार्यवाहीचा अधिकार प्राचार्यांकडे राहील.
-
वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यासाठी गणवेश अनिवार्य केला आहे . विद्यार्थी गणवेशात नसल्यास योग्य दंड आकारला जाईल.
नियम व अटी :
-
महाविद्यालयात एकदा घेतलेला प्रवेश एका शैक्षणिक वर्षाकरीता नोंदविला जातो . त्यामुळे प्रत्येक वर्षी महाविद्यालयात प्रवेश घेणे.
-
महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना स्थलांतर प्रमाणपत्र (मायग्रेशन सर्टिफिकेट ) प्राप्त झाल्यानंतरच प्रवेश अंतिम समजला जाईल.
-
प्रथमत : सर्व प्रवेश हे हंगामी स्वरुपाचे असतील , प्रवेशासंबंधी काही उणीवा , त्रूटी आढळून आल्यास प्रवेश रद्द करण्याचा अधिकार महाविद्यालयास राहील व त्यासाठी कारण दाखविण्याची आवश्यकता असणार नाही.
-
विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जावर दिलेल्या दाखल्याच्या मूळप्रती व त्यांच्या चार सत्यप्रती जोडणे आवश्यक आहे. महाविद्यालयातून कोणत्याही सबबीवर गुणपत्रिकेची किंवा प्रमाणपत्राची सत्यप्रत परत मिळणार नाही. राज्याबाहेरील प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रावर, संबंधित जिल्ह्यातील, जिल्हा शिक्षणाधिकाऱ्याची स्वाक्षरी व शिका आणणे आवश्यक आहे.
-
११ वी १२ वी प्रवेशाच्या तारखा , परीक्षा फिसच्या तारखा , शिष्यवृत्तीच्या तारखा या वेळोवेळी सूचना फलकावर लावल्या जातील. त्यांचे काटेकोरपणे पालन विद्यार्थ्याने करणे अपेक्षित आहे.
-
परीक्षांच्या फिसची तसेच वेळापत्रकाची तारीख निघून गेल्यानंतर वरील परीक्षांचे फॉर्म भरता आले नाहीत अथवा काही नुकसान झाले तर त्यास केवळ विद्यार्थ्यास जबाबदार धरण्यात येईल. त्यास महाविद्यालय जबाबदार असणार नाही.
-
विद्यार्थ्यांचे वर्तन महाविद्यालयात आणि महाविद्यालयाच्या परिसरात चांगले असावे . विद्यार्थ्यांची वर्तणूक योग्य नसल्यास ___ कोणत्याही प्रकारची पुर्वसूचना न देता महाविद्यालयातून विनासूचना काढून टाकण्याचे अधिकार प्राचार्यांना असतील.
-
प्रत्येक विद्यार्थ्यास प्रवेश मिळाल्यानंतर ओळखपत्रासाठी विद्यार्थ्याने योग्य आकाराचे छायचित्र कार्यालयात दिल्यानंतर प्राचार्यांच्या स्वाक्षरीने त्याला ओळखपत्र देण्यात येईल.
-
ओळखपत्र विद्यार्थ्याने महाविद्यालयात येतांना सोबत आणावे, या ओळखपत्राशिवाय त्यास वर्गात, वाचनालयात प्रवेश मिळणार नाही.
-
विद्यार्थ्याने प्रत्येक विषयाच्या तासिका, प्रात्यक्षिके व ट्युटोरियल्स इत्यादींसाठी वेळापत्रकाप्रमाणे उपस्थित राहणे आवश्यक आहे.
-
विद्यार्थ्याने प्रत्येक विषयाच्या तासिका, प्रात्यक्षिके व ट्युटोरियल्स इत्यादींसाठी वेळापत्रकाप्रमाणे उपस्थित राहणे आवश्यक आहे.
-
विद्यार्थ्यास महाविद्यालयाने घेतलेल्या सर्व परीक्षा द्याव्या लागतील आणि सर्व उपक्रमात सहभाग घ्यावा लागेल. पूर्ण वर्षाच्या कामकाजाच्या दिवसांपैकी किमान ७५ टक्के उपस्थिती असल्यानंतरच वार्षिक परीक्षेला बसता येईल.
-
विद्यार्थ्यास महाविद्यालयाने घेतलेल्या सर्व परीक्षा द्याव्या लागतील आणि सर्व उपक्रमात सहभाग घ्यावा लागेल. पूर्ण वर्षाच्या कामकाजाच्या दिवसांपैकी किमान ७५ टक्के उपस्थिती असल्यानंतरच वार्षिक परीक्षेला बसता येईल.
-
पालकांनी आपल्या पाल्याच्या नियमित उपस्थितीबद्दल महिन्यातून किमान दोन वेळा कार्यालयात चौकशी करणे आवश्यक आहे महाविद्यालयात घेण्यात येणाऱ्या पालक मेळाव्यास पालकांची उपस्थिती असावी.
-
प्राचार्यांच्या लेखी परवानगीशिवाय कुठल्याही विद्यार्थी संघटनेची स्थापना करता येणार नाही. महाविद्यालयाची कोणत्याही प्रकारची माहिती सार्वजनिक प्रसिध्दी देण्यासाठी प्राचार्याची लेखी परवानगी द्यावी लागेल.
-
महाविद्यालयाचे फर्निचर, पुस्तके व इतर साधनसामग्री तसेच महाविद्यालयाची इमारत या विषयाची योग्य ती काळजी विद्यार्थी घेतील. या संबंधी विद्यार्थ्याने काही नुकसान केल्यास विद्यार्थ्यांकडुन नुकसान भरपाई वसूल केली जाईल.
-
महाविद्यालयाची प्रतिमा उंचाविण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी प्रयत्नशील राहील प्रत्येक विद्यार्थ्यांची वर्तणूक इतर विद्यार्थ्यांबरोबर नम्र आणि योग्य प्रकारची असेल.
