प्रवेश पात्रता इयत्ता ११ वी
- महाराष्ट्रतील विविध विभागीय शिक्षण मंडळातून जे विद्यार्थी शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले असतील ते सर्व विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालयाच्या (११वी) कला, वाणिज्य, विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशपात्र असतील.
- महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाव्यतिरिक्त अन्य राज्यातील इतर माध्यमिक शिक्षण मंडळातून शालांत परीक्षा उत्तीर्ण असतील त्यांनी औरंगाबाद येथील माध्यमिक शिक्षण मंडळाचे पात्रता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. त्याकरिता पररात्यातील विद्यार्थ्यानी विहित नमुन्यातील अर्जासोतब खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे, त्याशिवाय प्रसेश दिला जाणार नाही.
- खाली नमूद केलयाप्रमाणे कागदपत्रे औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाची परवानगी (मान्यता प्राप्त) प्राप्त झाल्यानंतर प्रवेश दिला जाणार नाही.
- खाली नमूद केल्याप्रमाणे कागदपत्रे औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाची परवानगी (मान्यता प्राप्त) प्राप्त झाल्यानंतरच प्रवेश निश्चित समजला जाईल
- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत किमान ४० टक्के गुण असणे आवश्यक आहे.
- शाळा सोडल्याचा दाखला व दाखल्याच्या तीन छायांकित प्रती (झेरॉक्स)
- मुळ गुणपत्रिका व गुणपत्रिकाच्या तीन छायांकित प्रती (झेरॉक्स)
- उत्तीर्ण प्रमाणपत्र (परराज्यातील विद्यार्थ्यासाठी) ४) स्थानांतर प्रमाणपत्र (परराज्यातील विद्यार्थ्यासांठी)
- १०० रु.च्या स्टॅपवर हमीपत्र (परराज्यातील विद्याथर्यांसाठी)