प्रवेश व शुल्क याबाबत नियम आर्थिक सवलत व शिष्यवृत्ती

  • आर्थिक सवलत व शिष्यवृत्ती

    भारत सरकार शिष्यवृत्ती – वर्गीकृत जातीजमातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती दिली जाते. सन २००३-२००४ पासून इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांनाही भारत सरकार शिष्यवृत्ती दिली जाते.

आवश्यक कागदपत्रे

सर्वसाधारण नियम :

अपंग शिष्यवृत्ती नियम

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत किमान ४० टक्के गुण असणे आवश्यक आहे.

  • ओळखपत्र

    महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले ओळखपत्र घेणे आवश्यक आहे . त्यावर स्वत : चे अलीकडे काढलेले छोट्या आकाराचे छायाचित्र (फोटो) असणे आवश्यक आहे. ओळखपत्रावर प्राचार्य अथवा उपप्राचार्य यांची स्वाक्षरी असावी.ओळखपत्र एका वर्षासाठीच वापरता येईल.

  • उपस्थिती

    प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याने त्या वर्गाची परीक्षा देण्यासाठी तसेच सर्व उपक्रमात सहभाग घेण्यासाठी किमान १००% उपस्थिती असणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांसाठी हजेरी ७५ % पेक्षा कमी असेल त्या विद्यार्थ्यास परीक्षेस बसता येणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्याने तासिका, प्रात्यक्षिक, स्वाध्याय, वर्गचाचणी, घटक चाचणी, सराव परीक्षाव वार्षिक परीक्षा तसेच अभ्यासविषयक इतर सर्व उपक्रमांसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे.

  • स्थलांतर प्रमाणपत्र

    विद्यार्थ्याने स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ग्रंथालय व संबंधित विभागातून बेबाकी प्रमाणपत्र पूर्ण करुन ठराविक शुल्कासह अर्ज कार्यालयात जमा करावा . अर्ज केल्याच्या ७ दिवसानंतर प्रमाणपत्र देण्यात येईल.स्थलांतर प्रमाणपत्र विद्यार्थ्यांशिवाय कोणाकडेही देता येणार नाही. स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांकडे स्वत:चे ओळखपत्र असावे.

  • विद्यार्थ्यांसाठी ई-सुविधा

    महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठीई-सुविधा या कार्यक्रमांतर्गत वर्षभर शैक्षणिक एम.एम.एस. जसे वेळापत्रक , परीक्षा दिनांक , परीक्षेचे पेपर इ. माहिती विद्यार्थ्यास दिलेल्या मोबाईलद्वारे पुरवली जाते. प्रत्येक विद्यार्थ्याला एम.के.सी.एल. च्या वतीने एक लॉगइन , आय.डी. व पासवर्ड दिला जाणार असून त्या त्या विद्यार्थ्याचा बायोडाटा इंटरनेटवर ऑनलाईन असेल व विद्यार्थी त्याची माहिती स्वत : अद्ययावत करु शकेल.