प्रिय विद्यार्थी मित्र, मैत्रीण
शिक्षणाच्या दारात आपण येऊन ठेपलो की पुढे काय करायचं हा विचार सतत आपल्या आजूबाजूला उपस्थित होत असतो. त्यात काळजीने दिशा दाखवणाऱ्यांचे किंवा आपल्या क्षमता तपासणाऱ्यांते ते हात असतात. विद्यार्थी ज्या वेळेला शिक्षण घ्यायचे म्हणून एखाद्या संस्थेकडे बघतो त्यावेळी त्याची अपेक्षा ही फक्त त्यालाच माहीत असते. ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या या झालेल्या विस्तारात आपल्या सारख्या असंख्य विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या स्वप्नांचा वाटा आहे. छोटसं लावलेलं रोप वृक्षामध्ये रुपांतरीत होत असताना अनेक पावसाळे, उन्हाळे आणि सोबतच हिवाळे सुद्धा अनुभवतो. हे सगळं करत असताना मातीतून उगवण्याची आपली जिद्द ते छोटेसे रोपटे कधी सोडत नाही, वाढ ही सतत आणि निरंतर ठेवावीच लागते आणि ती सुद्धा कुठल्याही बाजूला न झुकता, उंच आभाळाकडेच दिशा असायला हवी यासाठी रोपट्याचे प्रयत्न असतात. शालेय शिक्षणामध्ये प्रकाश संश्लेषण प्रक्रिया जशी झाडांना जगण्यासाठीची ऊर्जा पुरवते अगदी त्याच पद्धतीची ऊर्जा माझ्या विद्यार्थी रुपी रोपट्यांना देण्यासाठी या शिक्षण संस्थेचा सूर्य हा सतत कार्यरत असतो.
ज्ञानाच्या विशाल सागरात आपले सगळ्यांचे मनःपूर्वक स्वागत आहे. ज्ञान-साधना करत असताना या समुद्राचा तळ आपण गाठावा आणि तिथून आसमंताची उंची मोजावी इतकी ताकद आपण मारलेल्या सुरात असावी हीच सदिच्छा व्यक्त करतो.
ऑल दि बेस्ट..!!
ज्ञानदीप शैक्षणिक संस्था
